आपल्या समाजातील तुमच्या आमच्या सारख्याच सामान्य दिसणाऱ्या व्यक्तींनी काही असाधारण गोष्टी साध्य केल्या आहेत. ‘गोष्ट अ’सामान्यांची’ या मालिकेतून आपण याच व्यक्तींच्या प्रेरणादायी प्रवासाबाबत जाणून घेणार आहोत. गेल्या आठवड्यात आपण m-Indicator या अॅपचे निर्माते सचिन टेके यांचा प्रवास जाणून घेतला. आजच्या भागात आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर कबड्डीच्या पंच म्हणून कामगिरी बजावणाऱ्या आरती बारी यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.
आरती बारी यांनी आपल्या समाजाच्या चौकटी मोडून स्वतःची स्वप्न साध्य केली आहेत. त्यांनी एशियन गेम्स, खेलो इंडिया, प्रो कबड्डी यासारख्या स्पर्धांसाठी पंच म्हणून कार्यभार सांभाळला आहे. त्यांचा हा प्रवास इतर मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. अशा अनेक व्यक्तींचा प्रेरणादायी प्रवास पाहण्यासाठी दर शुक्रवारी लोकसत्ता लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवर ‘गोष्ट अ’सामान्यांची’ नक्की पाहा.