मुंबई : अहमदाबाद – मुंबई सेंट्रलदरम्यान नव्या २० डब्यांच्या वंदे भारत ट्रेनची वेग चाचणी शुक्रवारी (९ ऑगस्ट) घेण्यात आली. अहमदाबाद – मुंबई सेंट्रलदरम्यान ताशी १३० किमी वेगाची चाचणी यशस्वी झाली.

रिसर्च डिझाईन्स ॲण्ड स्टँडर्डस् ऑर्गनायझेशनच्या (आरडीएसओ) देखरेखीखाली घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये नवीन वंदे भारत ट्रेन शुक्रवारी सकाळी ७ वाजता अहमदाबादहून निघाली आणि दुपारी १२.२१ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचली. या ट्रेनने अहमदाबाद – मुंबईदरम्यानचे अंतर ५ तास २१ मिनिटांत पूर्ण केले. सध्या १६ डब्यांच्या वंदे भारत ट्रेनला अहमदाबाद – मुंबई सेंट्रलदरम्यान पार करण्यासाठी ५ तास २५ मिनिटे लागतात. वेगाची चाचणी यशस्वी झाली, मात्र अंतिम अहवाल अद्याप तयार झालेला नाही, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.

Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mumbai central railway block loksatta news
मुंबई: मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Reliance-Disney merger completed, Reliance-Disney,
रिलायन्स-डिस्ने यांचे ७०,३५२ कोटींचे महाविलीनीकरण पूर्ण
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Western Railway service disrupted mumbaiu print news
पश्चिम रेल्वेची सेवा खोळंबली

हेही वाचा – झोपडीवासीयांचे भाडे थकवणारा विकासक काळ्या यादीत, गुन्हाही दाखल! प्राधिकरणाकडून प्रथमच कठोर कारवाई

हेही वाचा – मुंबई : म्हाडाची अल्प गटात महागडी घरे, वरळीतील सदनिका २.६२ कोटींची; मासिक उत्पन्नाची मर्यादा ७५ हजार रुपये

सध्या सेवेत असलेल्या १६ डब्यांच्या वंदे भारतमध्ये प्रवाशांची क्षमता १३५ ते १४० टक्के असते. नवीन २० डब्यांची वंदे भारत सुरू झाल्यास प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होईल. तसेच प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास आणि सर्वाधिक सुविधा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे.