‘वन डे..नो मोअर फॉरएव्हर’ व्हॉटसअ‍ॅपचा स्टेटस
गुन्हे शाखा ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद सावंत यांचा मुलगा तेजस (२१) याने वडिलांच्या सव्‍‌र्हिस रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास टिळकरनगर येथे ही घटना घडली. तेजसच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी त्याने ‘व्हॉटसअ‍ॅप’वर  दोन दिवसांपूर्वी ‘वन डे. नो मोअर फॉरएव्हर’ असा संदेश दिला होता.
अरविंद सावंत आपल्या कुटुंबासह टिळकनगरच्या १०८ क्रमांकाच्या इमारतीत राहात होते. सकाळी सातच्या सुमारास वडीलांचे रिव्हॉल्वर घेऊन स्वत:च्या डोक्यावर गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकताच सावंत कुटुंबिय हॉलमध्ये गेले. त्याला त्वरीत राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
तेजसने आत्महत्येपूर्वी कुठलीही चिठ्ठी लिहिलेली नव्हती. तो रुपारेल महाविद्यालयात बीएस्ससीच्या शेवटच्या वर्गात होता. त्याने दोन दिवसांपूर्वी त्याने आपल्या व्हॉटसअ‍ॅपच्या प्रोफाईलवर ‘वन डे.. नो मोअर फॉरएव्हर’ असे स्टेटस ठेवले होते. पोलिसांनी तेजसच्या मित्रांची चौकशी केली असून सावंत यांचाही जबाब नोंदविल्याची माहिती पोलीस उपायुक्त महेश घुर्ये यांनी दिली. तो अभ्यासात हुशार होता. परंतु या आत्महत्येमागे प्रेमप्रकरण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत
आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा