मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाप्रकरणी वकील नीलिमा चव्हाण यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहेत. तसेच, अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. मोरे यांनी ३१ ऑगस्ट रोजी घाटकोपर आणि विद्याविहारदरम्यान रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> रेल्वे प्रवाशांना मौल्यवान सामान सुरक्षितरित्या ठेवण्यासाठी ‘डिजी लॉकर्स’,महत्त्वाच्या स्थानकात डिजी लॉकरच्या संख्येत वाढ

मोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. चव्हाण यांनी आपल्या वडिलांचा छळ केल्याचा आरोप मोरे यांच्या मुलाने केला होता. तसेच, पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. त्याआधारे पोलिसांनी चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. चव्हाण यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने सत्र न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर चव्हाण यांनी अटकपूर्व जामिनासाठी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.