शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार याचं नाव न घेता त्यांच्या मुलीच्या लग्नात साडेनऊ कोटी रुपयांचं कारपेट टाकल्याचा आरोप केला. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. राज्य सरकारने माझ्या मुलीच्या लग्नातील सर्व व्यवहारांची चौकशी केली आहे. त्याचा अहवाल देखील आला आहे, असं मत सुधीर मुनंगटींवर यांनी व्यक्त केलं.
सुधीर मुनगंटीवार एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, “जेव्हा स्वतःच्या खर्चावर बोट ठेवलं जातं तेव्हा मनुष्य अशा पद्धतीने वागतो. या गोष्टीला सव्वादोन अडीच वर्षे झालीत आणि त्यांच्या विभागाने चौकशी देखील करून अहवाल दिलाय. पण मी कधी पत्रकार परिषद घेतली नाही. त्याचा अहवाल राज्य सरकारकडे आहे. माझ्या मुलीच्या लग्नातील सर्व व्यवहार चेकने झाले आहेत. संजय राऊत आणि त्यांचे मुख्यमंत्री स्वतः लग्नाला आले होते. त्यामुळे तो प्रश्न उपस्थित होत नाही.”
“कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे मंत्री होते, त्यांना कळलं नाही का?”
“मी महाविकास आघाडीचा निर्माता आहे, चाणक्य आहे असा अभास संजय राऊतांना झाला आहे. तेव्हा अशाप्रकारची कृती घडत असते. तेच घडतंय. राऊतांच्या ईडी मागे लागली हे मला माहीत नाही. राज्य सरकारने माझ्या मुलीच्या लग्नातील खर्चाची चौकशी केली आहे. आपल्यावर आरोप झाले म्हणून माझ्यावर आरोप करू नये. तेव्हा कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे मंत्री होते. त्यांना त्यावेळी कळलं नाही का? शिवसेनेचे मंत्री जागरूक होते,” असं सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितलं.
हेही वाचा : Sanjay Raut Press Conference Live: आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है ! – अमृता फडणवीस
“संजय राऊत यांच्या आरोपांना गंभीरतेने घेण्याची गरज नाही. त्यांच्या पत्रकार परिषद रिसर्च बेस असतात. हरामखोर या शब्दाचा अर्थ नॉटी, डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर मोठा असा ते रिसर्च करतात तेव्हा त्यांना याबाबत सर्व माहिती देण्याचा अधिकार आहे,” असंही मुनगंटीवार यांनी नमूद केलं.
संजय राऊत यांनी नेमके काय आरोप केले?
संजय राऊत म्हणाले, “एक वर्षापूर्वी मुंबईत एक लग्न झालं. भाजपाच्या नेत्याच्या मुलीचं लग्न झालं. आम्ही काही बोललो का? ते वनमंत्री होते म्हणून त्यांनी लग्नाचा सेट जंगलाचा केला. त्याला जंगलाचा फील यावा म्हणून त्यांनी जे कारपेट टाकलं होतं त्याची किंमत साडेनऊ कोटी रुपये होती. ईडीला हे दिसलं नाही का? आम्ही म्हणतो घरातील लग्न आहे. घरात शिरायचं नाही, पण आमच्या घरात तुम्ही अशा पद्धतीने शिरता.”
व्हिडीओ पाहा :
“जेलमध्ये टाकणार असाल तर टाका, मी तयार आहे”
“मुलांच्या घरात शिरताय, मुलांच्या कामाच्या ठिकाणी शिरताय, दादागिरी करताय, देख लेंगे बोलताय. अरे बघ ना, मी सांगतो बघा. बघून घ्या सांगणारा मी पहिला माणूस आहे. जेलमध्ये टाकणार असाल तर टाका, मी जायला तयार आहे, पण माझ्यासोबत तुम्ही देखील सगळे असाल,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
हेही वाचा : “…तर कोणाच्या बापाला घाबरु नका”; संजय राऊतांनी सांगितला बाळासाहेबांनी दिलेला मंत्र
“आमच्या मुलीच्या लग्नाच्या हिशोबाला लागले आहेत. फुलवाले, पताकावाले, मेहेंदीवाले, नेलपॉलिश करणारे यांच्याकडे ईडी गेली. किती पैसे दिले असं ईडीने विचारलं. हे ईडीचं काम आहे? गुजरातमध्ये यांच्या डोळ्यासमोर २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला. यांनी दोन वर्षे एफआयआर घेतली नाही,” असं म्हणत राऊतांनी गंभीर आरोप केला.