हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६५९ मध्ये आदिलशाहाचा सरदार अफझल खानाचा कोथळा काढून त्याचा वध केला. शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध करण्यासाठी वापरलेलं वाघनख हे शस्त्र भारतात आणलं जाणार आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने ही वाघनखं आणली जाणार आहेत. ही वाघनखं लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तूसंग्रहालयात आहेत. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी वाघनखं भारतात आणण्यासाठी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तूसंग्रहालयाशी करार करण्यासाठी लंडनला गेले होते. ही सगळी मंडळी करार करून बुधवारी (११ ऑक्टोबर) रात्री ११ च्या सुमारास मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानळावर दाखल झाली.

मुंबईत दाखल झाल्यावर सुधीर मुनगटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली आणि वाघनखं भारतात कधी येणार याबाबतची माहिती दिली. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, वाघनख महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात लंडन येथे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तूसंग्रहालयाशी आमचा करार झाला आहे. ब्रिटनच्या सरकारची परवानगी घेऊन वाघनख भारतात आणण्याची तारीख ही त्यांच्या माध्यमातून आम्हाला सांगितली जाणार आहे. वाघनख आणण्याची तारीख निश्चित झाल्यावर वाघनख आणण्यासाठी आम्ही सगळेचजण आवश्यक असल्यास परत एकदा लंडनला जाऊ. आमचा करार झाला असून वाघनखं महाराष्ट्रात नक्की आणणार, त्याची तारीख आपल्याला सांगितली जाईल.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Kalyan East Shiv Sena appoints Nilesh Shinde as city chief
कल्याण पूर्व शिवसेना शहरप्रमुखपदी नीलेश शिंदे यांची नियुक्ती
pune four pistols and two bikes seized
कोंढव्यात तिघांकडून चार पिस्तुले, दोन दुचाकी जप्त
second phase of tiger migration is complete with another tigress captured from Tadoba
दुसरी वाघीणही महाराष्ट्रातून पोहोचली ओडिशात…आंतरराज्यीय स्थलांतर अखेर…
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
Chitra Wagh accuses MVA of making a deal with Maharashtra
मविआवर महाराष्ट्राचा सौदा केल्याचा चित्रा वाघ यांचा आरोप
Mallikarjun kharge
Acharya Pramod Krishnam : “खरे हिंदू…”, मल्लिकार्जुन खरगेंवर काँग्रेसच्या माजी नेत्याचीच टीका!

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तूसंग्रहालयाशी आमची विस्तृत चर्चा झाली. महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या इतर गोष्टींदर्सभात चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाचं एक पथक लंडनला जाणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि ब्रिटनचं सरकार यांच्यात भविष्यात यांदर्भात चर्चा होईल. त्यांच्या ताब्यात असणाऱ्या आमच्या हक्काच्या वस्तू महाराष्ट्रात परत आणण्यासंदर्भात आमच्या सरकारच्या वतीने प्रयत्न केले जातील, तसेच यासाठी ब्रिटनच्या वस्तूसंग्रहालयाशी संपर्क कायम ठेवला जाईल.

हे ही वाचा >> Operation Ajay : इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल, परराष्ट्रमंत्र्यांनी दिली माहिती

यावेळी मुनगंटीवार यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी जगदंबा तलवार महाराष्ट्रात कधी आणली जाणार? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना राज्याचे सांस्कृतिक मंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगदंबा तलवारीच्या बाबतीत आमचा वस्तूसंग्रहालयाशी पत्रव्यवहार सुरू आहे. यात काही तांत्रिक मुद्दे आहेत. ते मुद्दे सोडवता आले तर तलवारसुद्धा आपल्याला परत आणता येईल.