महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी नऊ रुपये किलो दराने साखर वाटप सुरू केले आहे.आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे, राम कदम यांनी मुंबईतील आपापल्या मतदारसंघात स्वस्त दरात साखर वाटपासह विविध उपक्रम हाती घेतले आहेत. नाशिक येथील आमदारांनीही स्वस्तात साखर व फटाके यांची विक्री सरू केली आहे. आमदार राम कदम यांनी दिवाळीनिमित्त ११ हजार कुमारिकांच्या पूजनाचा उपक्रम हाती घेतला असून त्यांना भेटवस्तू देतानाच आई-वडिलांचा आदर करण्याचा संदेशही ते देतात. बाळा नांदगावकर यांच्यातर्फे शिवडी, लालबाग, परळ, भोईवाडा, काळाचौकी, लोअर परळ आदी नऊ ठिकाणी साखरवाटप केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
मनसेकडून ९ रुपये किलोने साखरवाटप
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी नऊ रुपये किलो दराने साखर वाटप सुरू केले आहे.आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे, राम कदम यांनी मुंबईतील आपापल्या मतदारसंघात स्वस्त दरात साखर वाटपासह विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
First published on: 08-11-2012 at 02:58 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugar distribution from mns