कांजूरमार्ग पोलिसांनी अंमलीपदार्थ सेवनप्रकरणात अटक केलेल्या १९ वर्षीय आरोपीने टेलिफोनच्या वायरने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर आरोपीला फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आले. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कांजुरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरबाज शेख (१९) याला अंमलीपदार्थांसह अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे कमी प्रमाणात अंमलीपदार्थ सापडले होते. त्यामुळे अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा कलम ८(क) व २०(ब) कायद्याअंतर्गत त्याला अटक करण्यात आली. सुरक्षेसाठी त्याला कच्च्या कैदेत ठेवण्यात आले होते. त्यावेळी छतावरून भींतीवर गेलेली टेलिफोनची वायर त्याने तोडली व त्याच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांनी पाहिल्यानंतर त्याला तात्काळ फोर्टीज रुग्णालयात नेण्यात आले. त्याची प्रक्रृती ठीक असून खबरदारी म्हणून त्याला २४ तास अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. आरोपीने आत्महत्याचे प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार महादेव गवस यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेबाबत अधिक चौकशी सुरू आहे.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली