मुंबई : दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षाच्या मुलाने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूपूर्वी त्याने कोणतीही चिठ्ठी लिहिली नसल्यामुळे त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – मुलाला भेट म्हणून दिलेली संपत्ती त्याच्यानंतर त्याच्या पत्नीकडून मागता येणार नाही, पालकांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

हेही वाचा – अनिल देसाई यांची मुंबई पोलिसांकडून सात तास चौकशी

मृत मुलाने सोमवारी पँटच्या पट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी त्याचे वडील कामावर गेले होते. आई व भाऊही घराबाहेर गेले होते. त्यामुळे मुलगा घरी एकटाच होता. घटनेनंतर त्याला तत्काळ रुग्णालयात नेले. पण तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून कुटुंबियांनी मृत्यूप्रकरणी कोणताही संशय व्यक्त केला नसल्याचे सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide of 10th class student mumbai print news ssb