मुंबईः नागपाडा पोलीस रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून ३९ वर्षीय पोलिसाने शनिवारी आत्महत्या केली. ते स्थानिक सशस्त्र पोलीस-३ येथे कार्यरत होते. नुकतीच त्यांची माहिम पोलीस ठाण्यावरून तेथे बदली करण्यात आली होती.

कैलास एकनाथ गवळी असे मृत पोलिसाचे नाव आहे. माहिमवरून त्यांची वरळी येथील एल-३ विभागात कार्यालयात बदली करण्यात आली होती. त्या काळात ते ८९ दिवस गैरहजर असल्यामुळे तंदुरुस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र मागण्यात आले होते. त्यासाठी त्यांना नागपाडा पोलीस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी ते रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील शौचालयात गेले. तेथील खिडकीतून त्यांनी खाली उडी मारली. त्यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यामुळे त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान गवळी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी गवळी यांच्या पत्नीचा जबाब नोंदवला आहे.

sugar Factories, sugar commissionerate, sugar,
आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय
no alt text set
भायखळ्यातील प्रचारात विकासकामांचा लेखाजोखा
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
mumbai 16 year old deaf mute girl raped
मुंबई : मूक-बधीर मुलीवर लैंगिक अत्याचार
Seven stalled projects on track soon speed up land acquisition process in five projects
रखडलेले सात प्रकल्प लवकरच मार्गी, पाच प्रकल्पांतील भूसंपादन प्रक्रियेला वेग
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
whom will saved by Division of votes in Vikhroli constituency
विक्रोळी मतदारसंघामध्ये मतांचे विभाजन कोणाला तारणार
special fund of 20 lakhs each to all departmental offices of Mumbai Municipal Corporation
सुविधांसाठी पालिकेचे पाच कोटी, पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाखांचा विशेष निधी
Rent free office space in Mhada Bhawan to developer in vangani
वांगणीतील विकासकावर ‘म्हाडा’ची कृपादृष्टी?

हेही वाचा – अटल सेतूवर २६४ वाहन चालकांवर कारवाई, वाहने उभी करून सेल्फी काढणाऱ्यांची संख्या अधिक

हेही वाचा – ‘दावोस’साठी ३४ कोटींची तजवीज

गवळी यांची बदली माहिम पोलीस ठाण्यावरून सशस्त्र पोलीस दल ०३ विभाग वरळी येथे झाली होती. त्यासाठी ते १२ जानेवारीला वरळी सशस्त्र विभागात हजर होण्यासाठी गेले. त्यावेळी ते ८९ दिवस गैरहजर असल्यामुळे त्यांना नागपाडा पोलिसांकडून तंदुरुस्ती प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली. त्यासाठी ते १२ जानेवारीला रुग्णालयात प्रमाणपत्र घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना प्रमाणपत्रासाठी रुग्णालयात दाखल होण्यास सांगण्यात आले होते, असे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर रविवारी गवळी यांनी रुग्णालयातून उडी मारली. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.