मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून सोमवारी पहाटे एका तरूणाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. या युवकाचे नाव विक्रम शिरीष वासुदेव असून वरळीकडून वांद्रयाला येणाऱया मार्गावरून आपल्या वॅगनार कारमधून येत होता. दरम्यान, त्याने आपली कार सेतूच्या कडेला थांबवून समुद्रात उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून युवकाचा शोध सुरु आहे. अद्यापतरी त्याचा मृतदेह सापडेला नाही.
वांद्रे-वरळी सागरी सेतूवर युवकाची आत्महत्या
मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून सोमवारी पहाटे एका तरूणाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली.
First published on: 01-09-2014 at 12:15 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suiside at bandra worli sea link