कुलदीप घायवट
चिमणीपेक्षा लहान आकाराचा, लांब, वाकडी आणि अणकुचीदार चोच असलेला, फुलातील मध पिण्यासाठी इकडे-तिकडे उडय़ा मारत भूर्रकन उडणारा असा गडद, तेजस्वी, आकर्षक जांभळय़ा रंगाचा सूर्यपक्षी नेहमी आपल्या सभोवताली दिसून येतो. त्याच्या रंगाने तो आपल्याला नयनसुख आणि आवाजाने मंत्रमुग्ध करून दुहेरी आनंद देतो. फुलाच्या दांडीवर उलटे लटकून मध शोषताना तो दिसतो. त्याच्या घरटय़ाची आकर्षक बांधणी त्याच्यातील कलाकारीही दर्शवते. हा पक्षी उगवत्या सूर्याबरोबरच मध भरलेल्या फुलांच्या शोधात निघतो. म्हणून त्याला सूर्यपक्षी व इंग्रजीमध्ये ‘सनबर्ड’ असे म्हटले जाते.
हेही वाचा >>> तलाठी भरती परीक्षेला उशीरा येऊन गोंधळ घातल्याचा प्रकार; संबंधितांवर कारवाईचे आदेश
सूर्यपक्षी अतिशय सुंदर असा छोटा पक्षी आहे. त्याची लांबी सुमारे १० सेंमी असते. सूर्यपक्ष्याच्या मादीच्या पाठीचा, पंख, डोके आणि मानेचा रंग हिरवट तपकिरी असतो. शेपटी गडद तपकिरी, पोटाचा भाग पिवळसर असतो. पाय आणि चोच काळय़ा रंगाची असते. विणीच्या हंगामात म्हणजे साधारणपणे उन्हाळय़ात नराचे डोके, मान, संपूर्ण पाठ, गळा आणि छाती जांभळय़ा रंगाची असते आणि त्यावर निळय़ा, हिरव्या छटा दिसतात. पंख तपकिरी काळे, शेपटी निळसर काळी, पोटाकडची बाजू फिकट जांभळट काळी, पंखाखाली किरमिजी व पिवळय़ा पिसांचा एक झुपका असतो. एरवी नराचा रंग मादीच्या रंगासारखा असतो. मात्र, मानेपासून ते पोटापर्यंत जांभळय़ा रंगाचा पट्टा असतो. फुलांचा अचूक वेध घेत मध शोषण्यासाठी हे पक्षी सर्वत्र भटकत असतात. सूर्यपक्ष्याची जीभ लांब व बारीक नळीसारखी असून तिने तो सर्व प्रकारच्या फुलातील मध शोषून घेतो. तसेच फुलांवर असलेले कीटक व कोळी देखील खातो. सूर्यपक्षी काही अंशी हिमगबर्डसप्रमाणे फुलासमोर उडू शकतात. फक्त फुलांमधील मध खाताना ते फुलाच्या देठावर बसतात.
सूर्यपक्ष्याचा समावेश ‘नेक्टॅरिनिइडी’ या पक्षिकुलात होतो. सूर्यपक्ष्याच्या तीन ते चार प्रजाती देशात आढळतात. त्याबरोबरच पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार येथेही सूर्यपक्षी आढळून येतात. त्यासा मराठीत शिंजीर, फुलचुखी, जांभळा सूर्यपक्षी, जांभळा शिंजीर, चुमका म्हटले जाते. इंग्रजीत सनबर्ड, पर्पल सनबर्ड नावाने ओळखले जाते. या पक्ष्याच्या सुमारे ९५ जाती असून बहुतेक जातींमधील नराचे रंग भडक व आकर्षक असतात. पानगळीचे जंगल, शेतीचा प्रदेश, माळराने, बागा, शेत, मळे, किनारी प्रदेश व झुडूपांमध्ये सूर्यपक्षी हमखास दिसून येतो. मुंबईतील प्रत्येक लहान बागामध्ये, पाणवठय़ाच्या ठिकाणी, वनराईत सूर्यपक्षी आढळतो.
हेही वाचा >>> म्हाडाच्या कोकण, पुणे, नागपूर आणि अमरावती मंडळाचा कारभार आता पूर्णत ऑनलाईन
फांदीला लटकणारी घरटी बांधणे हे त्याचे आणखी वैशिष्टय़ असतात. घरटे बांधण्यासाठी सुरुवातीला सूर्यपक्षी सुरक्षित जागा शोधतात. त्यानंतर झाडे-झुडपे किंवा वेलींच्या पुढील फांदीच्या टोकाला किंवा घराच्या सभोवताली टांगलेल्या तारांना, दोऱ्यांना लटकलेली उभी लांबट आकाराची घरटे तयार करतात. जमिनीपासून खूप कमी उंचीवर ते घरटे बांधतात. सुकलेली पाने, बारीक काडय़ा, वाळलेले गवत, दोरा आणि कोळिष्टकांपासून घरटे तयार केले जाते. ते बाहेरून लाकडाचे लहानलहान तुकडे, किटकांच्या अंडय़ांचे आवरण किंवा सालीने झाकलेले असते. तसेच प्रवेशद्वार एका बाजूला करून त्याला सज्जा तयार केलेला असतो. त्यामुळे इतर पक्ष्यांपासून सूर्यपक्ष्यांच्या पिल्लांना कमी धोका असतो. मादी एकटीच घरटे बांधण्याचे, अंडी उबविण्याचे काम करते. नर फक्त तिच्या सुरक्षिततेसाठी लक्ष ठेऊन असतो. तसेच पिल्लांना खाऊ घालण्याचे काम नर-मादी मिळून करतात. मादी पांढरट, बदामी आणि त्यावर करडे-काळे ठिपके असलेली अंडी घालते. निसर्गचक्रामध्ये सूर्यपक्षाचे महत्त्वाचे योगदान आहे. फुलांमधील मध शोषताना या पक्ष्यांमार्फत फुलांचे परागीभवन होऊन चांगली फलधारणा होते. सूर्यपक्षाने शहरी जीवनाशी जुळवून घेतल्याने त्यांची संख्या स्थिर आहे. मात्र शहरी उद्यानात, घराजवळील भागात परदेशी शोभेची झाडे जास्त झाल्याने त्यांना अन्न मिळवणे अडचणी ठरते आहे. देशी फुलझाडे व वेलींची लागवड केल्यास या पक्षाचे मनमोहक सौंदर्य प्रत्येकाला न्याहाळता येईल. तसेच त्याची संख्याही अबाधित राहिल.