मुंबई : मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरीता उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल.

मध्य रेल्वे

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर

कुठे : माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढे या जलद लो डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून अप जलद मार्गावरील लोकल सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन सर्व संबंधित स्थानकावर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.

हेही वाचा >>>मुंबईत ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस, तरीही पाण्याची चिंता नाही; कारण…

हार्बर मार्ग

कुठे : मानखुर्द-नेरुळ अप आणि डाऊन
कधी : सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५.

परिणाम : सीएसएमटी ते पनवेल, बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाऊन लोकल सेवा आणि बेलापूरहून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप लोकल सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते मानखुर्द या दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी, नेरुळ स्थानकांवरील ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल.