बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांना मुंबई सेशन कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पारसकर यांना ताब्यात घेऊन चौकशीची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे त्यामुळे पारसकर यांना या प्रकरणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईतील एका मॉडेलने पारसकर यांच्याविरोधात विनयभंग आणि बलात्काराचा आरोप करत नोटीस धाडली होती. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. याआधी पारसकर यांना नोटीस पाठविणाऱ्या मॉडेलने आपल्या वकिलासोबत केलेल्या संभाषणाच्या ध्वनिफितीत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा फायदाही पारसकर यांना होण्याची शक्यता निर्माण झाली. या ध्वनिफितीच्या जोरावरच पारसकर यांनी आपण निर्दोष असल्याचे म्हटले. त्यानंतर पारसकर यांच्या वकिलाने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंगळवारी मंजूर केला आहे.  

Story img Loader