ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या आईला एक भावनिक पत्र लिहिलं. त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता या पत्रावर संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेनेचे आमदार सुनिल राऊत यांनीही भावनिक प्रतिक्रिया दिली. “जेव्हा जेव्हा संजय राऊत मला भेटतात तेव्हा तेव्हा ते मला दोनच प्रश्न विचारतात,” अशी प्रतिक्रिया सुनिल राऊतांनी व्यक्त केली. ते बुधवारी (१२ ऑक्टोबर) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.

सुनिल राऊत म्हणाले, “संजय राऊत जेव्हा मला भेटतात, त्यावेळी ते मला दोनच प्रश्न विचारतात. आपला शिवसेना पक्ष कसा आहे, उद्धव ठाकरे कसे आहेत आणि दुसरं म्हणजे आई कशी आहे.”

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद

“माझी आई ८४ वर्षांची आहे. त्यामुळे ती कोर्टाच्या प्रत्येक सुनावणीला येऊ शकत नाही. संजय राऊत आणि आईचं विशेष नातं आहे. आई आणि मुलात काय प्रेम असतं हे सर्वांना माहिती आहे. आमचं संयुक्त कुटुंब आहे. मागील ६१ वर्षात संजय राऊत कधीही आईपासून एवढा मोठा अडीच महिन्यांचा काळ दूर राहिले नाहीत,” अशी भावना सुनिल राऊतांनी व्यक्त केली.

“संजय राऊत आणि आईची अडीच ते पावणे तीन महिन्यांपासून भेट नाही”

“ते दौऱ्यावर किंवा कामानिमित्त बाहेर गेले, तर चार ते पास दिवस किंवा जास्तीत जास्त आठ दिवस बाहेर राहायचे. मात्र, आत्ता ईडीने अटक केल्यामुळे संजय राऊत आणि आईची अडीच ते पावणे तीन महिन्यांपासून भेट नाही. त्यामुळे या भावनिक पत्रातून त्यांचं आईप्रति प्रेम त्यांनी व्यक्त केलं. तसेच त्यांच्या भावना पत्रातून आईला कळवल्या,” असंही सुनिल राऊतांनी सांगितलं.

“सोडून गेलेले ४० आमदार उद्या वर गेल्यावर बाळासाहेबांना काय तोंड दाखवणार”

सुनिल राऊत पुढे म्हणाले, “संजय राऊत यांचे ३०-३२ वर्षे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर गेले आहेत. आज जे ४० आमदार शिवसेना सोडून गेले, ते उद्या वर गेल्यावर बाळासाहेब ठाकरेंना काय तोंड दाखवणार आहेत.”

हेही वाचा : “CM शिंदेंना भेटलात का? शिंदे गटाने ऑफर दिली का? कोणाकडून लढणार?”; ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

“संजय राऊत भाजपासमोर झुकले असते, तर तेही आज घरी असते”

“परंतु संजय राऊत जेव्हा वर जातील तेव्हा बाळासाहेबांना निष्ठेने सांगतील की, तुमचा हा निष्ठावंत सैनिक झुकला नाही, गुडघे टेकले नाहीत आणि शिवसेना सोडली नाही. याच निष्ठेने ते आज तुरुंगात आहेत. ते भाजपासमोर झुकले असते, तर तेही आज घरी असते,” असं मत सुनिल राऊत यांनी व्यक्त केलं.