पक्षाच्या स्थापनेपासून सुरुवातीचे काही दिवस वगळता राष्ट्रवादी कायम सत्तेत होता; पण विरोधात बसावे लागल्याने पक्षात सध्या काहीसे शैथिल्य आले आहे. जनतेच्या प्रश्नावर आक्रमक होऊन हे शैथिल्य दूर करण्यात येईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी सांगितले. प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झाल्यावर पक्ष संघटना वाढविण्यावर तटकरे यांनी भर दिला आहे. मुंबई व विदर्भात पक्ष संघटना जास्त कमकुवत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी लक्ष घालणार असल्याचे तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पक्षाची कार्यकारिणी मर्यादित ठेवण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीतील शैथिल्य दूर करणार – तटकरे
पक्षाच्या स्थापनेपासून सुरुवातीचे काही दिवस वगळता राष्ट्रवादी कायम सत्तेत होता; पण विरोधात बसावे लागल्याने पक्षात सध्या काहीसे शैथिल्य आले आहे. जनतेच्या प्रश्नावर आक्रमक होऊन हे शैथिल्य दूर करण्यात येईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी सांगितले.

First published on: 01-05-2015 at 04:43 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil tatkare ncp