कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी अखेर मंगळवारी राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) मुंबईतील मुख्यालयात हजेरी लावली. सिंचन घोटाळ्याप्रकरणी राज्याचे सुनील तटकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी एसीबीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स धाडले होते. मात्र, समन्स जारी करूनही दोघेही निर्धारित तारखेला उपस्थित राहिले नाहीत. अखेर त्यांना पुन्हा चौकशीसाठी पाचारण करून आणखी एक संधी दिली गेली. त्यानंतर तटकरे यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने ठाणे येथील एसीबी कार्यालयात उपस्थिती नोंदविली होती. परंतु एसीबी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे तटकरे यांनाच २१ सप्टेंबरला जातीने हजर राहण्याचे समन्स पुन्हा नव्याने बजावण्यात आले होते. त्यानुसार आज तटकरे यांनी एसीबीच्या कार्यालयात हजेरी लावली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Oct 2015 रोजी प्रकाशित
सिंचन घोटाळा: सुनील तटकरे चौकशीसाठी एसीबीच्या कार्यालयात हजर
कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी सुनील तटकरे एसीबीच्या कार्यालयात हजर.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड

First published on: 20-10-2015 at 16:30 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil tatkare present in acb office for investigation