राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बुधवारी सुनील तटकरे यांची फेरनिवड करण्यात आली. पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक मुंबईत होते आहे. त्यामध्ये तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. छगन भुजबळ यांनी तटकरे यांच्या फेरनिवडीचा प्रस्ताव मांडला. त्याला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अनुमोदन दिले. 
तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदी कमी कालावधी मिळाल्यामुळे त्यांचीच पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड होणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यावर कार्यकारिणीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. गेल्या वर्षी झालेली विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेसने तटकरे यांच्याच नेतृत्त्वाखाली लढविली होती. मात्र, त्यामध्ये पक्षाला विशेष यश मिळाले नव्हते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil tatkare reelected as state president of ncp