मुंबईः जादुटोणा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करावा, असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने जारी केले आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) छेरिंग दोरजे यांनी संबंधित आदेश राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक कार्यालयांना पाठवले आहेत.

महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ च्या कलम ५ (१) अन्वये संबंधित आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात सहाय्यक आयुक्त (गुन्हे), तसेच पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) यांची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम २०१३ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक कक्ष स्थापन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Extravagance of one lakh crores by rulers party in state Priyanka Chaturvedis allegation
राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून एक लाख कोटीची उधळपट्टी, ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचा आरोप
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त

हेही वाचा – आनंदाचा शिधासाठीच्या निविदा प्रक्रियेतील अटीला आव्हान

हेही वाचा – लालबागमध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात चार जण भाजले; एकाची प्रकृती चिंताजनक

पोलीस महासंचालक कार्यालयाकडून हे आदेश सर्व पोलीस आयुक्त, सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठवले आहेत. त्यामुळे जादुटोणा कायद्याअंतर्गत प्रकरण हाताळण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तसेच तक्रारीची अंमलबजावणी व गुन्ह्याचा तपास याबाबत तक्रारदाराला दक्षता अधिकाऱ्याकडे दाद मागता येणार आहे. १९ जुलै रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) छेरिंग दोरजे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. आदेश मिळाल्यानंतर संबंधित कार्यवाहीला सुरुवात करण्याबाबत आदेशात नमुद करण्यात आले आहे.