मुंबई : पालिकेच्या शाळेतील मुलांचा गणवेश यंदा बदलण्यात आला असून नवीन गणवेशाचा पुरवठा अखेर सुरू झाला आहे. मुलांना सोमवारपासून गणवेश देण्यास सुरुवात झाली. मोठ्या वर्गातील मुलांसाठी तपकिरी रंगाचा गणवेश व शिशुवर्गातील मुलांसाठी लाल रंगाचा गणवेश दिला जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?
गेल्या कित्येक वर्षांपासून असलेला पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा गणवेश यावर्षीपासून बदलण्यात आला आहे. निळ्या रंगाचा अनेक वर्षांपासून असलेला गणवेश बदलून त्याऐवजी तपकिरी रंगाचा गणवेश देण्यात येणार आहे. १५ सदस्यांच्या समितीने हा गणवेश निश्चित केला आहे. मात्र शाळा सुरू होऊन अर्धे वर्ष झाले तरी अद्याप मुलांना नवीन गणवेश मिळाला नव्हता. त्यामुळे शिक्षण विभागावर टीका होत हाती. विद्यार्थी जुन्याच गणवेशावर शाळेत जातात तर काही विद्यार्थी गणवेशाविना जात होते. मात्र आता अखेर गणवेश तयार होऊन आले आहेत व त्यांचे टप्प्याटप्प्याने वितरण सुरू झाले आहे. येत्या काही दिवसात दिवाळीची सुट्टी सुरू होणार असल्यामुळे मुलांना हे गणवेश दिवाळीनंतरच घालता येणार आहेत.
हेही वाचा : मुंबई: अमेरिकेवरून कुरिअरद्वारे अंमलीपदार्थांची तस्करी ; दोघांना अटक
पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी २७ शैक्षणिक वस्तू मोफत दिल्या जातात. यंदा मात्र शाळा सुरू झाल्या तरी वस्तूंचे वितरण न झाल्यामुळे पालिकेवर टीका झाली होती. त्यानंतर हळूहळू एकेक वस्तू देण्यात आली. छत्री व दप्तरासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना रोख रक्कम दिली. मात्र गणवेश अद्यापही मिळाला नव्हता.पालिकेच्या सर्व शाळा आता मुंबई पब्लिक स्कूल म्हणून ओळखल्या जातात. तसेच एसएससी राज्यमंडळाव्यतिरिक्त सीबीएसई, आयसीएसई आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या शाळाही पालिकेने सुरू केल्या आहेत. या सर्व बदलांबरोबरच गणवेश बदलाची प्रक्रियाही शिक्षण विभागाने सुरू केली होती.
यंदा पालिकेच्या शाळेत एक लाख मुलांनी नव्याने प्रवेश घेतला त्यामुळे वि्दयार्थ्यांची संख्या चार लाखांवर पोहोचली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेशाची जोडी, क्रीडा गणवेश यांचा पुरवठा करण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. गणवेश पुरवठादार निश्चित करण्याची प्रकिया जुलै अखेरीस पूर्ण झाली होती व ऑगस्टमध्ये कार्यादेश देण्यात आला होता. ४ लाख विद्यार्थ्यासाठी ८८ कोटी ७८ लाख ६५ हजार ३३४ रुपये खर्च येणार आहे.
१. पालिकेच्या ९७३ प्राथमिक व २४३ माध्यमिक शाळा आहेत.
२. या शाळांमध्ये ४ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.