मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षांच्या निकालाची सर्वानाच उत्सुकता असली तरी निकाल काहीही लागो सध्याच्या सरकारच्या स्थैर्यावर त्याचा परिणाम होणार नाही. एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे या आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या राजकीय भवितव्यासाठी हा निकाल दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेवर उद्या निकाल अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालय अपात्रतेवर निर्णय घेण्याची शक्यता नाही. कारण अपात्रतेचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना असतो. अगदी शिंदे यांच्यासह सर्व १६ आमदार अपात्र ठरले तरीही भाजपच्या पाठिंब्यावरील सरकार कोसळण्याची शक्यता अजिबात नाही. कारण १६ आमदार अपात्र ठरल्यास विधानसभेचे २८८ मधून १६ने संख्याबळ कमी होईल. म्हणजेच २७२ आमदारांच्या संख्येनुसार बहुमताची आवश्यकता असेल. सध्या सरकारला १६४ आमदारांचा पाठिंबा आहे. १६ने संख्याबळ कमी झाले तरीही निम्म्यापेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा या सरकारला आहे. यामुळेच निकालाचा सरकारच्या स्थैर्यावर काहीही परिणाम होणार नाही. यामुळेच निकाल काहीही लागो सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होत नसल्याने भाजपचे आमदार निर्धास्त आहेत.

अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Redevelopment , Developers Committee, Old Thane ,
जुन्या ठाण्यातील पुनर्विकासासाठी विकासकांची समिती
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
Naxal Attack In Chhattisgarh
नक्षलवाद संपवण्याचा अगम्य आशावाद…
Eknath Shinde Group , Pratap Sarnaik,
स्बळाच्या नाऱ्यानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटावर टिकेचे बाण

निकाल बाजूने लागल्यास मुख्यमंत्री शिंदे यांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर होऊ शकेल. तसेच त्यंचे राजकीय वजन वाढू शकेल.

उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा निकाल महत्त्वाचा आहे. शिवसेना नाव आणि चिन्ह हे निवडणूक आयोगाने आधीच शिंदे गटाला दिले आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडलेली नाही तर आम्ही नेतृत्वात बदल केला हा शिंदे गटाचा युक्तिवाद मान्य झाल्यास ठाकरे यांची अधिकच पंचाईत होईल. कारण भविष्यात ठाकरे व त्यांच्याबरोबरील आमदारांना शिंदे गटाचा पक्षादेश बंधनकारक ठरेल. पक्षातील फुटीनंतर ठाकरे गटाची सारी मदार ही न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. निकाल शिंदे यांच्या बाजूने गेल्यास ठाकरे गटाला अधिक फटका बसेल. ठाकरे यांच्या बरोब र असणारे काही प्रमुख कार्यकर्ते शिंदे यांच्या बाजूने जाऊ शकतात. कायदेशीर लढाईत पराभव झाल्यास त्याचा राजकीय आघाडीवरही फटका ठाकरे यांना बसू शकतो.

निकाल काहीही लागो सरकार पडण्याची शक्यता कमी असल्याने काँग्रेस वा राष्ट्रवादीचे नेते फार काही सक्रिय झालेले नाहीत.

न्यायालयाच्या निकालाच प्रत्येकाने सन्मान ठेवावा- राहुल नार्वेकर

पुणे : संविधान आणि लोकशाहीवर देशातील प्रत्येक नागरिक विश्वास ठेवणार आहे. लोकशाहीतील प्रमुख घटक असलेल्या न्यायालयाचा जो काही निर्णय असेल, त्याचा सन्मान प्रत्येकाने ठेवला पाहिजे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.  राज्यातील सत्तासंघर्षांचा निकाल गुरुवारी (१० मे) सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली.   विधानसभा अध्यक्ष म्हणून मी आत्ताच नव्हे तर पहिल्या दिवसापासून जबाबदारीने काम पाहत आहे, असे त्यांनी सांगितले. ऐन निकालाच्या कालावधीत लंडनला जाण्याबाबत विचारले असता नार्वेकर म्हणाले,की मी लंडनला कायमचा नव्हे तर फक्त दोन-तीन दिवसांसाठी जात आहे. निकालानंतरही मी माझे काम जबाबदारीने पार पाडणार आहे.

न्यायालयाच्या निकालाबाबत आम्ही आशावादी आहोत. आमची केस मजबूत आहे. योग्य निकाल येईल अशी अपेक्षा आहे. निकाल येईपर्यंत थांबले पाहिजे. त्यावर अटकळबाजी करणे वा अंदाज बांधणे योग्य नाही.

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  

देशात संविधान व कायदा शिल्लक असल्यास आम्हाला न्याय मिळेल.– खासदार संजय राऊत  ( शिवसेना उद्धब बाळासाहेब ठाकरे ).

Story img Loader