भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असतानाच गेल्या आठवडय़ात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतल्यावर सोमवारी पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
अवकाळी पावसाने झालेले नुकसान तसेच अर्थसंकल्पात महाराष्ट्राकडे झालेले दुर्लक्ष या संदर्भात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गेल्याच आठवडय़ात जमीन अधिग्रहण विधेयकावरून झालेल्या कोंडीच्या पाश्र्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्या भेटीत क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीवर चर्चा झाल्याचे बोलले जात होते. आठवडाभराच्या मुदतीत पवार आणि त्यांच्या कन्येने पंतप्रधानांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी काँग्रेसचे नेते संशयाची भावना व्यक्त करू लागले आहेत. राष्ट्रवादीने मात्र सारे आरोप फेटाळून लावले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2015 रोजी प्रकाशित
पंतप्रधान-सुप्रिया सुळे भेट
भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असतानाच गेल्या आठवडय़ात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतल्यावर ..

First published on: 03-03-2015 at 03:18 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule meet pm modi for helping mahatastra farmer