महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची शनिवारी राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. सुप्रिया सुळे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भुजबळांना भेटण्यासाठी आर्थर रोड कारागृहात दाखल झाल्या होत्या. यावेळी भुजबळ आणि सुप्रिया सुळे यांच्यात १० ते १५ मिनिटे चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, या भेटीनंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना त्यांनी हसतमुखाने हॅपी होली एवढेच उत्तर दिले. दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या या भेटीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुजबळ यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे दिसत आहे.
सडक्यातले किडके 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ईडी’ने चौकशीला भुजबळ यांना चौकशीला पाचारण केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही नेत्याकडून भुजबळ यांचे ठामपणे समर्थन करण्यात आले नव्हते.  त्यामुळे मराठा समाजाचे प्राबल्य असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ एकटे पडल्याचे चित्र निर्माण झाले होते.  मात्र, सुप्रिया सुळेंच्या आजच्या भेटीने पक्ष भुजबळांच्या पाठीशी उभा असल्याचा संदेश देण्यात आला आहे. छगन भुजबळ यांना ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.  दरम्यान, पंकज भुजबळ यांनादेखील आज धर्मादाय आयुक्तांकडून एमईटी शिक्षण संस्थेसंदर्भात चौकशीसाठी बोलविण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता समीर आणि छगन भुजबळ यांच्यापाठोपाठ पंकज भुजबळदेखील तुरूंगात जाणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
भुजबळांसाठी आमचा पक्ष कायदेशीर लढा देईल- शरद पवार 

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule met chhagan bhujbal in arthur road jail