नवी मुंबईतील बिल्डर सुनिल लोहरीया यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी सुरेश बिजलानी याला शुक्रवारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापुर्वी वाशी न्यायालयाने त्याला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या कोठडीदरम्यान त्याने पोलिसांना आजारी असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला तपासणीकरीता वारंवार दवाखान्यात घेऊन जावे लागल्याने पोलिसांना या गुन्’ााचा तपास करता आला नव्हता. यासाठी पोलिसांनी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली होती.
सुरेश बिजलानी याला पोलीस कोठडी
नवी मुंबईतील बिल्डर सुनिल लोहरीया यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी सुरेश बिजलानी याला शुक्रवारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
First published on: 03-08-2013 at 07:39 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh bijlani gets police custody