आतापर्यंत मुंबईत रेल्वेच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी म्हणावी तशी गुंतवणूक कधीच करण्यात आली नाही. मात्र आतापर्यंत काय झाले, यापेक्षाही आपण भविष्यात काय करणार आहोत ते महत्त्वाचे आहे. मुंबईचे देशातील महत्त्व लक्षात घेता येत्या काळात मुंबईतील रेल्वेचे जाळे अधिकाधिक चांगले करण्यासाठी मुंबईत मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे मुंबईवर येत्या काळात अधिकाधिक सुविधांचा वर्षांव होणार असल्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी दिले.
कांजुरमार्ग स्थानकात सहा मीटर रुंद पादचारी पूल, सरकते जिने, एक नवीन फलाट आदी प्रकल्प तसेच विद्याविहार स्थानकातील नवीन पादचारी पूल आणि सरकत्या जिन्याचे कामही ‘एमआरव्हीसी’ने पूर्ण केले आहे. या सर्व कामांसाठी १५ कोटी रुपये खर्च झाले असून या दोन्ही स्थानकांमधील या प्रकल्पाचे लोकार्पण शनिवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दादर येथे व्हिडीओद्वारे करण्यात आले. या वेळी दादर येथे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशीष शेलार, आमदार कपिल पाटील आदी उपस्थित होते. तर कांजुरमार्ग स्थानकात खासदार किरीट सोमैया आणि भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मुंबईकरांना अधिक सुविधा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे आश्वासन
आतापर्यंत मुंबईत रेल्वेच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी म्हणावी तशी गुंतवणूक कधीच करण्यात आली नाही.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-05-2016 at 02:29 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh prabhu promises new measures to revamp ailing railways