मुंबई : घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगर येथील १६ हजार ५७५ झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यातील १६९४ रहिवाशांची पात्रतेची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली आहे. आता लवकरच त्या १६९४ जणांचे परिशिष्ट २ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उर्वरित रहिवाशांची पात्रतेची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. महिन्याभरात सर्व १६ हजार ५७५ रहिवाशांचे परिशिष्ट २ प्रसिद्ध केले जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रमाबाईनगरातील १६५७५ झोपड्यांचा पुनर्विकास झोपु आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) संयुक्त भागीदारी तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्यातही पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पासाठी ज्या १६९४ झोपड्या हटवाव्या लागणार आहेत, त्या झोपड्यांचे पहिल्या टप्प्यात प्राधान्यक्रमाने सर्वेक्षण पूर्ण करून त्यांची पात्रता निश्चिती पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून सर्वात आधी या झोपड्या पाडून जागा रिकामी करून पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरणास सुरुवात करता येईल. त्यानुसार झोपुने १६५७५ झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करत पहिल्या टप्प्यात थेट विस्थापित होणाऱ्या १६९४ रहिवाशांची पात्रता निश्चिती करत १६९४ रहिवाशांची पात्रतेची प्रारूप यादी याआधीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता यावरील सूचना-हरकती विचारत घेत परिशिष्ट २ प्रसिद्ध केले जाईल.

हेही वाचा – डोंबिवलीतील घातक उद्योगांचे पातळगंगा, अंबरनाथला स्थलांतर ; धोरण ठरविण्यासाठी तीन सचिवांची समिती

हेही वाचा – ८० ते ९० जागा देण्याचा भाजपचा शब्द ; वादानंतर छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण

आता येत्या काही दिवसांत उर्वरित रहिवाशांची पात्रतेची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. प्रारूप यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावरील सूचना-हरकती मागविण्यात येतील आणि महिन्याभरात सर्व १६ हजार ५७५ रहिवाशांचे परिशिष्ट २ प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Survey of ramabai ambedkar nagar completed mumbai print news ssb