दर बुधवारी ६७ आरोग्य केंद्रांमध्ये नियमितपणे सर्वेक्षण करणार

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीने राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह व पक्षाघात नियंत्रण आणि प्रतिबंधक कार्यक्रम अंतर्गत शहरातील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये झोपडपट्टी आणि वस्त्यांमध्ये लोकसंख्या आधारित आरोग्य चाचणी सर्वेक्षणाला ४ जानेवारीपासून सुरूवात करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने ३० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींची चाचणी करून उच्च रक्तदाब आणि असंसर्गजन्य आजारविषयक धोके जाणून घेण्यात येतील. दर आठवड्याला बुधवारी नियमितपणे हे सर्वेक्षण राबविले जाणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिकेत शिंदे गट सक्रीय होणार ? महानगरपालिका क्षेत्रासाठी पाच जणांवर जबाबदारी

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ३० वर्षांवरील व्यक्तींचे आरोग्य चाचणी सर्वेक्षण करण्यासाठी ऑगस्ट २०२२ पासून १५ रुग्णालयांमध्ये रक्तदाब आणि मधुमेहासाठी असंसर्गजन्य आजार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रांमध्ये आतापर्यंत ७८ हजार ६९८ जणांची तपासणी करण्यात आली आहे. आरोग्य चाचण्या आणि प्रायोगिक स्वरुपातील सर्वेक्षणाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून आता राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह व पक्षाघात नियंत्रण आणि प्रतिबंधक कार्यक्रमाअंतर्गत, शहरातील २४ प्रशासकीय विभागांमध्ये, झोपडपट्टी आणि तत्सम वस्त्यांमध्ये, आरोग्य स्वयंसेविका आणि आशा सेविका यांच्या सहकार्याने लोकसंख्या आधारित आरोग्य चाचणी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने ३० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींचे उच्च रक्तदाब आणि असंसर्गजन्य आजारविषयक धोके जाणून घेण्यात येतील. हे सर्वेक्षण ४ जानेवारी २०२३ पासून ६७ आरोग्य केंद्रांमध्ये सुरू करण्यात आले आहे. दर आठवड्याला बुधवारी हे सर्वेक्षण नियमितपणे राबविले जाणार आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरित आरोग्य केंद्रांमध्येही सर्वेक्षण करण्यात येईल.

हेही वाचा >>> मुंबईः २२ कोटी रुपयांच्या हेरॉईनसह हैदराबादमधील रहिवाशाला अटक; विमानतळावर सीमाशुल्क विभागाची कारवाई

या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक, प्रसारमाध्यमे, स्वयंसेवी संस्था आणि खासगी संस्था यांनी पाठिंबा द्यावा, तसेच महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये अथवा खासगी डॉक्टरांकडे जाऊन रक्तातील साखरेचे प्रमाण, तसेच रक्तदाब तपासण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे, या आजारांना वेळीच प्रतिबंध करण्यासाठी दैनंदिन जीवन निरोगी राखावे, पुरेसा व पोषक आहार घ्यावा, पुरेशा शारीरिक हालचालींद्वारे निरोगी अशी दैनंदिन जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, सार्वजनिक आरोग्य खात्याच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी केले आहे.