केंद्रीय गृहमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. फुप्फुसाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या शिंदेंवर आज (रविवार) दुपारी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तीन दिवस त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. डॉ. आर. देशपांडे आणि ए. जोग यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
काँग्रेस नेते नसीम खान यांनी शनिवारी आयोजित केलेल्या इफ्तार मेजवानीत सुशीलकुमार शिंदे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. त्यानंतर त्यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुशीलकुमार शिंदेंवर यशस्वी शस्त्रक्रिया
केंद्रीय गृहमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
First published on: 04-08-2013 at 10:17 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushil kumar shinde hospitalised