केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रकृती व्यवस्थित असून, त्यांना तीन दिवसांत रुग्णालयातून सोडण्यात येईल, असे त्यांची मुलगी आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले. 
शिंदे यांच्यावर गेल्या रविवारी मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात फुफ्फुसावरील छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळे ते सध्या रुग्णालयातच विश्रांती घेत आहेत. रुग्णालयातून सोडल्यानंतर लगेचच ते पूर्ववतपणे आपले काम करू सुरू करणार आहेत.

Story img Loader