केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांना अतिदक्षता विभागातून आता बाहेर हलविण्यात आले आहे. गेल्या रविवारी त्यांच्या फुफ्सुसावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. येत्या दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात येणार असले तरी आणखी आठवडाभर तर त्यांना विश्रांती घ्यावी लागेल, अशी शक्यता आहे. परिणामी पुढील आठवडय़ातही संसदेच्या अधिवेशनात ते सहभागी होऊ शकणार नाहीत.

Story img Loader