शिवसेनेला ( ठाकरे गट ) दोन मोठे धक्के बसले आहेत. शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यातच आमदार मनिषा कायंदे शिवसेनेच्या ( शिंदे गट ) वाटेवर आहेत. मनिषा कायंदे यांच्या पक्षप्रवेशावर आमदार संजय शिरसाट यांनी शिक्कामोर्तब केला आहे. यावरून ठाकरे गटाकडून मनिषा कायंदे यांच्यावर टीकास्र सोडलं जातं आहे. उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही मनिषा कायंदे यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे.

“मराठवाड्यात एक म्हण आहे, एक पाय तुटल्याने गोम लंगडी होत नाही. एवढे सगळे शिवसैनिक आहेत. बचेंगे, लढेंगे औरं जीतेंगेभी. गेल्या तीन दिवसांत मंत्रालयातून ४० कोटींपेक्षा अधिक फाईल्स कोणाच्या क्लिअर झाल्या आहेत. त्यात किती आमदारांची नावे आहेत, हे एकदा आपण शोधावे. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला उत्तरे मिळतील,” असं सुषमा अंधारेंनी सांगितलं.

हेही वाचा : “मोदींनी मणिपूरमध्ये जाऊनच दाखवावं, मग त्यानंतर…”, उद्धव ठाकरेंचं थेट पंतप्रधानांना आव्हान; म्हणाले, “भाकड-कथा…”

“…म्हणून गद्दारी आणि बेईमानी केली”

मनिषा कायंदेंच्या पक्षप्रवेशावर खासदार विनायक राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “सत्तापिपासू, स्वार्थी आणि संधीसाधू विधानपरिषेदच्या आमदार शिंदे गटात जाणार आहेत. याची कल्पना आम्हाला दोन महिन्यांपासून होती. विधानपरिषदेवर पुन्हा संधी मिळण्यासाठी गद्दारी आणि बेईमानी केली आहे. यांना राजकारणात काडीचीही किंमत नव्हती, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. एवढा मोठा मानसन्मान प्राप्त करून दिला,” असं विनायक म्हणाले.

हेही वाचा : मनिषा कायंदेंसह ३ नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा, संजय राऊत म्हणाले, “अशा लोकांचा…”

“नियती कधीही माफ करणार नाही”

“आज शिवसेना पक्षाला गरज असताना उपकारकर्त्यांशी बेईमानी करून सत्तेसाठी राजकारणाच्या डबक्यात उडी मारत आहेत. तुम्हाला नियती कधीही माफ करणार नाही,” असा इशाराही विनायक राऊत यांनी दिला आहे.

Story img Loader