विधान परिषदेच्या उपनेत्या आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला. नीलम गोऱ्हेंच्या या निर्णयानंतर राजकीय व सामाजिक वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी नीलम गोऱ्हे यांनी घेतलेल्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं. ठाकरे गटाकडून नीलम गोऱ्हेंवर सडकून टीकाही झाली. आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना एक खुलं पत्र लिहित हल्लाबोल केला. या पत्रात सुषमा अंधारेंनी नीलम गोऱ्हेंवर जातीयवादाचे गंभीर आरोपही केले आहेत.

सुषमा अंधारेंनी लिहिलेल्या पत्र खालीलप्रमाणे,

नीलमताई, शेवटी तुमचेही पाय मातीचेच…

raj Thackeray Asilata Raje
Raj Thackeray : स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात आहे राज ठाकरेंची बालमैत्रीण, म्हणाले, “आम्ही शिशूवर्गापासून…”
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Raj Thackeray
Raj Thackeray : ‘अजित पवारांबरोबर बसणं म्हणजे मला श्वास घेता येईना म्हणणारे …’, राज ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
sada sarvankar marathi news (1)
“उद्धव ठाकरेंसारखा माणूस राजकारणात सापडणार नाही”, सदा सरवणकरांच्या नावाने पोस्ट व्हायरल; स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाले…
a young guy holding paati in hand wrote amazing message who burst so many firecrackers in Diwali
Video : “दिवाळीत फटाके तेवढेच फोडा…”; तरुणाने सुनावले खडे बोल, पाटी होतेय व्हायरल
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
Marathi Actor Siddharth Chandekar share post for diwali wish of fans
“नकोच तो अंधार…”, अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने अनोख्या अंदाजात दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, म्हणाला, “आजूबाजूच्या गोंगाटात…”
Aditya Thackeray
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? आदित्य ठाकरे म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी…”

प्रिय ताई,

काही माणसं पदामुळे मोठी होतात. काही पदं माणसांमुळे मोठे होतात, पण काही माणसं निव्वळ माणसांमुळे मोठे होतात. तुम्ही यातल्या पहिल्या प्रकारातल्या आहात.

तुमचे अनेक किस्से महिला पदाधिकारी सांगायचे तेव्हा मला त्यांचा राग यायचा. वाटायचं, एका विद्वान बाईला निष्कारण बदनाम केलं जातंय. लातूरच्या संघटिका चालक मामी दोन महिन्यापूर्वी डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या की, निलम ताईने मला प्रेसमध्ये बसू दिलं नाही. अपमानित केलं. पुण्याच्या स्वाती ढमाले यांना तुम्ही गाडीत बसू दिलं नाही, तर सोलापूरच्या संघटिकेला मुंबई बंगल्यावर स्वच्छतागृह वापरण्यास मज्जाव केला.

शिल्पकार राजेंद्र आल्हाट यांच्या एका प्रदर्शनात उद्घाटनाला गेल्यावर हातात कात्री देतो का म्हणून त्याला डाफरून डाफरून बोललात. अमरावतीची पोलीस पत्नी वर्षा भोयरने तुमच्याकडे मदत मागितली, पण जात बघून इग्नोर केले. तुमच्या स्वश्रेष्ठत्व अन् अहंकाराचे अनेक किस्से. म्हटलं तर वरवर खूप साधारण वाटणारे, पण म्हटलं तर जातश्रेष्ठत्वाने पछाडलेले.

भांडवली व्यवस्थेच्या विरूद्ध विचार मांडता मांडता तुम्ही स्वतःच त्या व्यवस्थेचा भाग कधी झालात हे तुम्हालाच कळले नाही. स्त्री आधार केंद्राचा गवगवा करत अनेक पद, पुरस्कार अन् माया जमा करणाऱ्या तुम्ही खेळाडू महिलांबद्दल अवाक्षरानेही बोलला नाहीत. ना कृषी कायदा आंदोलनात चिरडलेल्या शेतकऱ्यांबद्दल ब्र शब्द काढला. ही केवढी मोठी शोकांतिका म्हणायची..!

तुम्हाला आठवतं का जाधवर ग्रूप ऑफ इंस्टिट्युटच्या विद्यार्थी संसद कार्यक्रमात २०१८ मध्ये मी आपल्याला भेटून शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली. त्या कार्यक्रमात एकनाथ खडसेही होते. तेव्हा आपण तो विषय झुरळासारखा झटकून दिला होता. तेव्हाही आपला अहंकार आणि जातश्रेष्ठत्व वाद मला कळायला हवा होता, पण मग पुढे अनेक लोक भेटत राहीले. सागर माळकर, मदन गाडे, कितीतरी.

अगदी मागील वर्षीही माझा प्रवेश तुम्हाला अजिबात आवडला नव्हता. अन् हे माझ्याही आधी सन्मानीय वरिष्ठांनी हेरले होते. म्हणूनच प्रवेशाच्या दिवशीच तुमचा उल्लेख त्यांनी खाष्ट सासू असा केला. हे सगळं लिहिण्याचं कारण तुम्ही माझा द्वेष करताना त्याची कारणं जातीय अधिक होती. सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबातील मुलगी स्वकर्तृत्वाने ऊभी राहणे तुम्हाला न मानवणारे होते.

तुम्हाला राजकीय जन्म प्रकाश आंबेडकरांनी दिला, पण समोर संधी दिसताच तुम्हाला त्याचाही विसर पडला. कालचा तुम्ही केलेला उल्लेखही तुमच्यातला काठोकाठ भरलेला जातीय विखार सांगणारा होता. तुम्ही भलेही कितीही पदे भोगली (हो भोगलीच, भूषवली नाही) असतील, पण माणूस म्हणून तुम्ही कमालीच्या भणंग आणि कफल्लक आहात. कारण ना तुम्ही कुणाला मदतीचा हात देवू शकता, ना कुणाचा उत्कर्ष बघू शकता, ना उपकारकर्त्याची जाणीव ठेवू शकता.

तुम्ही राहता त्या मॉडेल कॉलनी, शिवाजी नगरमध्ये ना साधी एक शाखा काढू शकलात ना, एखादा नगरसेवक निवडून आणू शकलात. महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा वकूब नसताना ज्या पक्षाने एवढं दिलं तो पक्ष आणि कुटुंब संकटात असताना, सत्तेसाठी पळ काढला. पण कुठलेही सत्तास्थान नसताना आमच्यासारखे निष्ठावान ठामपणे मातोश्रीबरोबर निकराची झुंज देत आहेत. अन् तुमच्यासारखे खुर्च्या टिकवण्यासाठी छळ कपट करणाऱ्यांची भाटगिरी करत आहेत.

हेही वाचा : “…तर मी शपथ घेतो की, मी जयंत पाटलांसह पक्ष सोडेन”, जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना आवाहन

मॅडम, म्हणूनच तुमच्या पक्षप्रवेशाच्या वेळी एकही सटरफटर काय तुमच्यासारखा ‘सो कॉल्ड’ एकही माणूस तुमच्याबरोबर दिसला नाही. यावरूनच आयुष्यात तुम्ही पैसा आणि पद खूप कमावली, पण माणुसकी नाही हे स्पष्ट होते. ठाकरेंचा एक माणूस आपल्याकडे घेतला याचा शिंदेंना कदाचित असुरी आनंद होईल, पण तुम्हाला घेण्याचा त्यांना एकही मत वाढवण्यासाठी म्हणून फायदा नक्कीच होणार नाही. म्हणुनच तुम्ही धोरणी राजकारणी असू शकाल, पण माणूस म्हणुन भणंग आणि कफल्लक आहात.!

सुषमा अंधारे</p>