केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘धनुष्याबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर सोमवारी उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘मशाल’ हे चिन्ह दिले होते. तर शिंदे गटाच्या चिन्हाचा निर्णय रोखून ठेवण्यात आला होता. दरम्यान, आज निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – Shinde vs Thackeray: शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “ही तर भाजपाची…”

“आम्ही ‘बाळासाहेबांचे शिवसैनिक’ म्हणत त्यांनी जी ढाल घेतली आहे, ती केवळ गद्दारी आणि विश्वासघात लपवण्यासाठी आहे. मात्र, मला त्यांच्या दोन तलावारी कशासाठी अशा प्रश्न पडला आहे. कारण एका म्यानामध्ये एकच तलवार राहू शकते. मग आता भाजपा कोणाची तलावार वापरणार, असा प्रश्न मला पडला आहे. आम्ही रडीचा डाव खेळणारे नाहीत. त्यामुळे सामना सुरू होण्यापूर्वी त्यांना शुभेच्छा देते”, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

हेही वाचा – ‘ढाल-तलवार’ निशाणी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘धनुष्याबाण’ हे चिन्ह गोठवल्यानंतर सोमवारी दोन्ही गटाला नवे नाव दिले होते. तर उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आले होते. मात्र, शिंदे गटाच्या चिन्हाचा निर्णय रोखून धरला होता. दरम्यान आज निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह दिल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता शिंदे गटालाही चिन्ह मिळाल्यानंतर अंधेरी पोटनिडणुकीत मशाल विरुद्ध ढाल-तलवार असा सामना रंगणार आहे.

Story img Loader