उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला ( ठाकरे गट ) डिवचलं होतं. शिवसेना आपल्याकडं आहे. त्यांच्याकडं आहे, ती शिल्लकसेना आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हणत शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं होतं. याला उपनेत्या सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आले आहेत. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिल्लक सेना आहे. ती शिल्लक सेनाच आहे. खरी शिवसेना आपल्याकडं आहे. हे तीनही पक्ष एकत्रित आले, तरीही भाजपा-शिवसेना युतीच्या पाठिशी जनता उभी राहील. कारण, अडीच वर्षाचा कारभार जनतेने पाहिला आहे,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. यावर सुषमा अंधारेंनी भाष्य केलं आहे. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.

हेही वाचा : “देवेंद्रजी, हिंमत असेल तर…”, मोदी-शाहांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचं खुलं आव्हान!

“…मला त्याचा अभिमान आहे”

“होय, खरेच ही शिल्लक सेना आहे. जे जे गद्दार होते, ते निघून गेले आहेत. जे-जे इमानदार होते, ते शिल्लक राहिलेत. अशा शिल्लक इमानदारांची, प्रामणिक लोकांची, निष्ठावतांची आणि लढवय्यांची ही शिवसेना आहे. मला त्याचा अभिमान आहे,” असं सुषमा अंधारेंनी सांगितलं.

हेही वाचा : “मोदींनी मणिपूरमध्ये जाऊनच दाखवावं, मग त्यानंतर…”, उद्धव ठाकरेंचं थेट पंतप्रधानांना आव्हान; म्हणाले, “भाकड-कथा…”

“एक पाय तुटल्याने गोम…”

आमदार मनिषा कायंदे यांच्या शिंदे गटातील प्रवेशावरही सुषमा अंधारेंनी टीका केली. “मराठवाड्यात एक म्हण आहे, एक पाय तुटल्याने गोम लंगडी होत नाही. एवढे सगळे शिवसैनिक आहेत. बचेंगे, लढेंगे और जीतेंगेभी. गेल्या तीन दिवसांत मंत्रालयातून ४० कोटींपेक्षा अधिक फाईल्स कोणाच्या क्लिअर झाल्या आहेत. त्यात किती आमदारांची नावे आहेत, हे एकदा आपण शोधावे. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला उत्तरे मिळतील,” असं सुषमा अंधारे म्हणाल्या.