घरात कुणी नसताना दहा वर्षांच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी बदलापूर येथे घडली.
शहरातील पश्चिम विभागातील रमेशवाडी येथील श्रीदेव अपार्टमेंटमध्ये राहणारे मणिलाल भाटिया पत्नी व दोन मुलांसह राहतात. रविवारी भाटिया दाम्पत्य पाहुण्यांसह मुंबईला गेले होते. त्या वेळी चौथीत शिकणारा दहा वर्षांचा धाकटा मुलगा अजय एकटाच घरात होता. दुपापर्यंत तो बाहेर खेळत होता. संध्याकाळी ५.३० च्या सुमारास तो घरात आला. रात्री भाटिया दाम्पत्य घरी आल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मात्र अजयची उंची आणि छताचे अंतर पाहता ही आत्महत्या की हत्या याबाबत शंका व्यक्त केली जात आहे

Story img Loader