कांदिवली पश्चिमेतील रघुलीला मॉलजवळील लोकमान्य टिळक नगरात २० वर्षे वयाच्या तरुणीने रविवारी मध्यरात्री घरात पंख्याला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. आठ दिवसांपूर्वी पाटण्याहून भावाकडे राहावयास आलेल्या या तरुणीने केलेल्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
अंजली श्रीवास्तव असे या तरुणीचे नाव असून ती भाऊ विकास कुमार याच्याकडे राहण्यासाठी आली होती. लोकमान्य नगरातील एकमजली घरात विकास कुटुंबीयांसह राहत होता. रविवारी सायंकाळी हे सर्वजण जुहू चौपाटी येथे फिरण्यासाठी गेले. तेथून परतल्यानंतर भाऊ कुटुंबीयांसह पोटमाळ्यावर तर अंजली तळमजल्यावर झोपली होती. सकाळी तो उठून खाली आला तेव्हा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत अंजली आढळून आली. त्याने तात्काळ तिला भगवती रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
अंजलीचा मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आला आहे. हा अहवाल मिळाल्यानंतरच अंजलीने आत्महत्या केली का, हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.   

Story img Loader