डॉ. पायल तडवी प्रकरणाचा तपास संदिग्धरीत्या सुरू असल्याचा आरोप करत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने केला आहे. हा तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. शनिवारी नायर रुग्णालयासह तपास अधिकाऱ्यांची आयोगाने भेट घेऊन प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांच्यासह सात जणांचा चमू शनिवारी मुंबईत होता . नायर रुग्णालय प्रशासनाची चर्चा करून घटनाक्रम आयोगाने जाणून घेतला. त्यानंतर डॉ. पायलच्या वसतिगृहाची पाहणी केली. तिच्या आईवडिलांची भेट घेऊन तिला सहकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती घेतली. या प्रकरणाचा सुरुवातीपासून तपास करणाऱ्या पोलिसांशी चर्चा केली.

सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर तातडीने पोलिसांना कळविण्यात येते. परंतु या प्रकरणांमध्ये पोलिसांना जवळपास दीड तासाने घटनेबाबत कळविण्यात आले. ती मृतावस्थेत सापडल्यानंतर त्या ठिकाणी आरोपी असलेल्या दोन डॉक्टर उपस्थित होत्या. त्यांनीच तिला खाली उतरविले. तातडीने उपचारासाठी म्हणून त्यांनी हे केले असल्याचा दावा केला असला तरी ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत तपास होणे आवश्यक आहे. इतक्या दिवसांच्या तपासानंतरही अजून शवविच्छेदनाचा अहवाल आलेला नाही यावर आश्चर्य व्यक्त करत तपासातील दिरंगाईवर आयोगाने बोट ठेवले.

आत्महत्या केल्याच्या घटनेपासून तिचे शव खाली उतरविण्यापर्यंतच्या घटनेपर्यंत मधल्या काळात नेमके काय काय घडले याबाबत तपशीलवार तपास झालेला नाही. ही घटना घडल्यानंतर तिला खाली उतरवेपर्यंत रुग्णालय प्रशासनाच्या कोणत्याही वरिष्ठ व्यक्तीला कळविण्यात आले नव्हते. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासामध्ये संदिग्धता असल्याचे स्पष्ट होते. अनेक समित्या स्थापन करून आणि केवळ जबाब नोंदवून या प्रकरणाचा छडा लागणार नाही. वेगवेगळ्या समितीने उपस्थित केलेल्या विरोधी मुद्दय़ावरून वाद उद्भवण्याचीच शक्यता अधिक आहे.

गुन्हे अन्वेषण विभागाने तपासातील ढिसाळपणा दूर करून शक्य तितक्या लवकर तपास पूर्ण करावा असे सूचित केल्याचे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी सांगितले.

कामाच्या ठिकाणी छळावर प्रतिबंधात्मक उपायांची चर्चा

कामाचा ताण आणि अनियमित वेळांसह रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टर यांच्यामध्ये संवाद आणि समन्वयाचा अभाव असल्याने वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना छळाला सामोरे जावे लागते, असे मत शनिवारी नायर रुग्णालयाच्या मार्ड संघटनेने आयोजित केलेल्या ‘वैद्यकीय क्षेत्रात कामाच्या ठिकाणी होणारा छळ’ या परिसंवादात मांडले गेले. या परिसंवादात टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या शैक्षणिक विभागाचे संचालक डॉ. श्रीपाद बनावली, केईएमच्या मानसिक आरोग्य विभागप्रमुख डॉ. शुभांगी पारकर, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. अनिरुद्ध मालगावकर आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा सहभागी झाले होते. वैद्यकीय शिक्षणातील पदानुक्रम संपणे अत्यावश्यक असून विद्यार्थ्यांची तक्रार तातडीने दाखल करून त्यावर तपास होणे गरजेचे असल्याचे डॉ. बनावली यांनी अधोरेखित केले.