मुंबईजवळ पालघरच्या समुद्रात एक संशयास्पद बोट दिसली आहे. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाकडून ही बोट शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. हे दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत आले होते. तेव्हापासून मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरील संशायस्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एक जॉईंट ऑपरेशन सेंटर नावाची एक संस्था बनवण्यात आली होती. या संस्थेकडून पालघरच्या समुद्रात संशयास्पद बोट दिसल्याची माहिती देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. एबीपी माझाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यानुसार मुंबईच्या किनारपट्टीजवळ एका लाईट हाऊसच्या जवळच ही बोट दिसली. त्यानंतर सर्व संरक्षण संस्था सक्रिय झाल्या आहेत. सागरी पोलीस आणि नौदलाकडून ही बोट शोधण्याचं काम सुरू आहे.

पालघर पोलिसांनी माहिती दिली आहे की ही बोट गेटवे ऑफ इंडियापासून दक्षिणेकडे ५० नॉटिकल मील दूर पालघरमध्ये दिसली आहे. इंटेलिजेन्स ब्युरो आणि सीबीआयदेखील ही बोटीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ही बोट शोधण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspicious boat spotted near mumbai palghar coast pakistani suspected asc