कांदिवली पूर्व येथे आज (गुरुवार) २७ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला असून, महिलेची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलीस व्यक्त केला आहे. याप्रकरणी कुरार पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनिषा पृथ्वीलाल जैस्वार असे मृत महिलेचे नाव असून कांदिवली येथील गोकुळ नगरमधील चाळीत ती एकटीच राहत होती. बुधवारी मध्यरात्री महिलेचा चुलत भाऊ सुरेश जैस्वार याने पोलिसांना दूरध्वनी करून त्याच्या चुलत बहिणीने आत्महत्या केल्याची माहिती दिली.

त्यानुसार कुरार पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता महिलेच्या डोक्यावर व गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महिलेला तात्काळ शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मनिषाला मृत घोषित केले.

मृत महिला गेल्या दीड वर्षांपासून कामानिमित्त मुंबईत एकटीच राहत होती. त्यांचे आई-वडील उत्तर प्रदेशात राहत असून याप्रकरणी कुरार पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. पण मृत्यू संशयास्पद वाटत असून शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspicious death of woman in kandivli stabs on the head and neck with a sharp weapon mumbai print news msr