‘स्वच्छ भारत’ या देशव्यापी मोहिमेंतर्गत राज्यपाल सी. विद्यासागर राव हे आज, शनिवारी जे. जे. रुग्णालयात स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत.
पंतप्रधानांनी नेमलेल्या ‘स्वच्छता दूत’ नीता अंबानी यांच्यासह राज्यपाल शनिवारी सकाळी ११ वाजता जे.जे. रुग्णालयात जातील. त्या ठिकाणी स्वच्छता मोहिमेची सुरुवात केल्यानंतर त्यांच्या हस्ते वृक्षारोपण होईल. नंतर राज्यपाल रुग्णालयाच्या काही वॉर्डाची पाहणी करतील. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने हेही त्यांच्यासोबत असतील.

Story img Loader