मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीच मनाचा ठाव घेणारे असे असावे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिरूर तालुक्यातील वढू (बु.) व हवेली तालुक्यातील तुळापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा आज वर्षां निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीसमोर सादर करण्यात आला. संभाजी महाराजांचे आयुष्य संघर्षमय असे होते. त्यांच्या कारकिर्दीत अनेक चढउतार होते. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे प्रतििबब हे स्मारक पाहणाऱ्यांच्या मनात उमटावे इतके भव्य, देखणे आणि अर्थपूर्ण असे स्मारक असले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळय़ा संकल्पना सादर केल्या जाव्यात. त्या त्रिमितीय स्वरूपात सादर करण्यात याव्यात, असे आदेशही ठाकरे यांनी दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा