लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: राज्य परिवहन (एसटी) महामंडळामधील नव्या हिरकणीची सेवा ‘स्वारगेट – मंत्रालय’ या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मार्गावरून सोमवारपासून सुरू झाली आहे. पुणे विभागातील दोन नव्या हिरकणीची सेवा ‘स्वारगेट – मंत्रालय’ या मार्गावर चालवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मंत्रालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना नव्या हिरकणी सेवेचा लाभ मिळाला आहे.

एसटीच्या ताफ्यातील हिरकणी बस दुरावस्थेत होती. त्यामुळे अनेक प्रवाशांनी एसटी पाठ दाखवली होती. त्यानंतर एसटी महामंडळाने स्व:बनावटीची हिरकणी तयार करण्याचा निर्णय घेतला. एसटी महामंडळाच्या पुण्यातील दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत एकूण २०० नव्या हिरकणी तयार केल्या जात आहेत. सध्या रायगड, पुणे विभागाच्या ताफ्यात नवी हिरकणी दाखल झाली आहे.

आणखी वाचा-मुंबई: पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाड

पुणे विभागातील दोन हिरकणी ‘स्वारगेट – मंत्रालय’ या मार्गावर चालवण्यास सोमवारपासून सुरुवात केली आहे. स्वारगेटवरून सकाळी ५.४५ वाजता हिरकणी बस सुटेल आणि ही साधारण सकाळी ९/९.३० पर्यंत मंत्रालयात पोहचेल. त्यानंतर ही बस सकाळी १० च्या दरम्यान मुंबई सेंट्रल आगारात दाखल होऊन तेथून स्वारगेटकडे रवाना होईल, असे नियोजन केल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swargate mantralaya new hirakani bus service launched mumbai print news mrj
Show comments