डिसेंबरच्या मध्यापर्यंत फारसा सक्रिय नसलेला स्वाइन फ्लू नववर्षांत पुन्हा परतला आहे. जानेवारीपासून राज्यात एकूण २७ जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. यातील सर्वाधिक म्हणजे १५ मृत्यू नागपूरमध्ये झाले आहेत. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत विशेषत पश्चिम उपनगरांत स्वाइन फ्लूचे दहा रुग्ण आढळले आहेत. यातील दोन रुग्ण कृत्रिम श्वसनयंत्रणेवर आहेत. स्वाइन फ्लूवर उपचार शक्य आहेत, त्यामुळे लक्षणे आढळल्यास तातडीने पालिका रुग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.
आतापर्यंत राज्यात स्वाइन फ्लूचे एकूण ११३ रुग्ण सापडले. यंदा स्वाइन फ्लूचा जोर नागपूरमध्ये असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे ५० रुग्ण नागपूरमध्ये तर त्याखालोखाल ४४ रुग्ण पुण्यात आढळले आहेत. अवघ्या तीन दिवसांत दहा रुग्ण आढळल्याने मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानेही सर्व रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, गुजरातमध्येही स्वाइन फ्लूने ६२ जणांचा बळी घेतला आहे.
राज्याला स्वाइन फ्लूचा विळखा
डिसेंबरच्या मध्यापर्यंत फारसा सक्रिय नसलेला स्वाइन फ्लू नववर्षांत पुन्हा परतला आहे. जानेवारीपासून राज्यात एकूण २७ जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-02-2015 at 03:25 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swine flu coils maharashtra