शहराच्या विविध भागात लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांची नोंद होत आहे. ऑगस्टमध्ये आतापर्यंत लेप्टोमुळे दोघांचा मृत्यू झाला असून त्यातील एक महिला अंधेरी येथे तर दुसरी कांदिवली येथील निवासी होती. स्वाइन फ्लूची साथही आटोक्यात येण्याची चिन्हे नसून पहिल्याच आठवडय़ात १०१ रुग्णांची नोंद झाली असून चौघांचा मृत्यू झाला.  जुलैच्या पहिल्या आठवडय़ात लेप्टोची साथ पसरली होती. त्यावेळी अवघ्या पंधरा दिवसांत १६ मृत्यू झाले. जुलैमध्ये लेप्टोच्या ७८ रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत लेप्टोच्या दहा रुग्णांची नोंद झाली. हे रुग्ण शहराच्या विविध भागातील आहेत. यातील कांदिवली येथील ४५ वर्षांच्या महिलेचा ५ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला तर अंधेरी येथील ६५ वर्षांच्या महिलेचा ८ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. स्वाइन फ्लूची मुंबईतील साथही आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. स्वाइन फ्लूच्या रुग्णांनी पहिल्याच आठवडय़ात शंभरी पार केली आहे. यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. जुलैमध्ये १९५ रुग्ण व सात मृत्यू झाले. आता ऑगस्टमध्ये ही साथ अधिक तीव्र झाली आहे. पहिल्या ११ दिवसांतच १०१ रुग्णांची नोंद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swine flu lepto scare in mumbai
Show comments