लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने ‘टी – २०’ विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले. विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा गौरव करण्यासाठी आणि हा विजय साजरा करण्यासाठी मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमदरम्यान विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. खुल्या बसगाडीमधून अथांग समुद्रासमोरून ही विजयी मिरवणूक वानखेडे स्टेडियमकडे मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये विजयोत्सव साजरा होणार आहे. या विजयोत्सवाचा साक्षीदार बनण्यासाठी बहुसंख्येने चाहत्यांनी गर्दी केली असून वानखेडे स्टेडियम हाऊसफुल्ल झाले आहे. मुंबईतील विजयोत्सवात मुसळधार पावसानेही हजेरी लावली आहे, मात्र चाहत्यांचा जोरदार जल्लोष सुरुच आहे.

Team India to Meet PM Narendra Modi Highlights
Team India Victory Parade Highlights: बीसीसीआयने टीम इंडियाला दिला १२५ कोटींचा चेक, विराट-रोहित झाले भावुक
cyber fraud of 2.5 crores with 76 years-old man
मुंबई : ७६ वर्षीय व्यक्तीची अडीच कोटींची सायबर फसवणूक
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
wrestler Suraj Nikam Suicide
‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमने गळफास घेत आयुष्य संपवलं, कुस्ती विश्वावर शोककळा
UP Hathras Stampede News in Marathi
Hathras Stampede : “गर्दी आणि देणगी जमवण्याकरता…”, अटक केलेल्या सेवेकऱ्यांची पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती!
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”

मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानक, वानखेडे स्टेडियम, मरिन ड्राईव्ह आणि नरिमन पॉईंट परिसरात चाहत्यांची गर्दी उसळलेली आहे. भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घालून अनेकजण या विजयोत्सवात सामील झाले आहेत. भारताचा राष्ट्रध्वज, अभिनंदनपर फलक आणि भारतीय क्रिकेट संघाची जर्सी हातात घेऊन तरुणाईच्या घोषणांनी परिसर दुमदुमला आहे. मुंबईच्या दिशेने लोकल गाड्या भरून चर्चगेटपर्यंत पोहोचत आहेत. लोकलमध्येही तरुणाईकडून घोषणाबाजी सुरू आहे. तसेच, चर्चगेट परिसरात वाहतूक कोंडीचेही चित्र पाहायला मिळत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आणखी वाचा-मुंबई : ७६ वर्षीय व्यक्तीची अडीच कोटींची सायबर फसवणूक

भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात तब्बल १७ वर्षांनंतर ‘टी – २०’ विश्वचषकाला गवसणी घातली, त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वकौशल्याचेही भरभरून कौतुक होत आहे. मुंबईतील विजयोत्सवात ‘मुंबईचा राजा – रोहित शर्मा’ या घोषणेने तरुणाईने परिसर दणाणून सोडला आहे. तसेच, ढोल – ताशांच्या गजरात तरुणाई थिरकत आहे. ‘टी – २०’ विश्वचषकाची प्रतिकृती आणि भारतीय खेळाडूंची प्रतिमा असलेले फलकही हातात घेऊन मनसोक्तपणे नाचत आहेत. तर हा अविस्मरणीय क्षण अनेकजण मोबाईलच्या कॅमेरात टिपत आहेत.