मुंबई : आशयप्रधान, काहीशा गंभीर आणि स्त्री केंद्री भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तापसी पन्नू पहिल्यांदाच पूर्णपणे विनोदी आशय असलेल्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एकापाठोपाठ दोन हटके निखळ मनोरंजन असलेल्या चित्रपटातून भूमिका करायला मिळाल्याबद्दल कमालीचा आनंद झाला असल्याची भावना तिने व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘वो लडकी हैं कहां’ या चित्रपटात तापसी आणि अभिनेता प्रतिक गांधी अशी वेगळी जोडी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट पूर्णपणे विनोदी असल्याने पहिल्यांदाच अशा चित्रपटात काम करताना मजा आल्याचे तापसीने सांगितले. विनोदी भूमिका करणे सोपे नाही. अशा चित्रपटात तुमची संवादफेक, अचूक वेळेत सहज संवाद बोलणे आणि त्याला समोरच्यांकडूनही तितकीच जबरदस्त प्रतिक्रिया मिळणे गरजेचे असते. साधारणपणे नेहमीच्या विनोदी चित्रपटांमध्ये नायिकेला फक्त ग्लॅमरसाठी वापरले जाते. इथे मात्र तसे झालेले नाही. इथे मी विनोदी भूमिकेत असल्याने मला माझ्या नायकावर विनोदी कोटी करण्याची संधी मिळाली आहे, असे तापसीने सांगितले. तुमच्यावर केले गेलेले विनोद पचवता आले पाहिजे, तसेच दुसऱ्यावरही कोटी करणे तितके सोपे नसते. मुळातच विनोद करणे ही अवघड बाब आहे. त्यामुळे या चित्रपटात पहिल्यांदाच विनोदी भूमिकेचे आव्हान पेलण्याचा अनुभव मिळाल्याचे तिने स्पष्ट केले.

हेही वाचा – मुंबई: महिलेच्या पोटातून काढली साडेतीन किलो वजनाची गाठ

हेही वाचा – मुंबईः पाच कोटी रुपयांची फसवणूकप्रकरणी झारखंडमधील रहिवाशाला अटक

याशिवाय, राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपटातही काहीशी विनोदी भूमिका तिच्या वाट्याला आली आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच सुपरस्टार शाहरूख खान याच्याबरोबरीने मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातही विनोदी भूमिका करता आली याबद्दल आनंद व्यक्त करत चोखंदळ भूमिका निवडत आजवर केलेल्या वाटचालीमुळेच हे यश अनुभवायला मिळाले, असे ती म्हणाली. गेल्यावर्षी नेटफ्लिक्सवर गाजलेल्या तिच्या ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटाचा पुढचा भाग ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ नावाने यावर्षी प्रदर्शित होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taapsee pannu will act in a comedy film for the first time mumbai print news ssb