२०१३-तंत्रज्ञान
क्षितिजाची सीमारेषा ठरवणे जशी अवघड गोष्ट आहे तितकीच तंत्रज्ञानातील प्रगतीचे मोजमाप घेता येणे अशक्य आहे, इतकी तंत्रक्रांती रोजच्या रोज घडत असते. आजच्या ‘अपडेटेड’ वस्तू ‘आऊटडेटेड’ होण्यासाठी उद्याची वाट पाहावी लागत नाही एवढा वेग तंत्रप्रगतीला आहे. २००० साली मोबाइलनामक वस्तूने बाजारात शिरकाव केला तेव्हा श्रीमंतीच्या निकषांमध्ये तो असणे महत्त्वाचे मानले गेले. पण मोबाइलचे जाळे इतके विस्तारले की, तत्पूर्वी टेलिफोनसंपन्न गृहाचे वर असलेले नाक या मोबाइलने कापून काढले. २००४ साली भारतासह, जगभरामध्ये टेलिफोनधारकांहून अधिक मोबाइलधारक होते. २००४ सालाच्या दरम्यान इंटरनेटसाठीचा सायबर कॅफेचा कैफ वैयक्तिक इंटरनेट स्वस्त झाल्याने उतरला. आता २०१३ इंटरनेट ‘मोबाइल’ करणारे टॅबवर्ष म्हणून नोंद होणार आहे, कारण लॅपटॉप, डेस्कस्टॉपहून अधिक मोबाइल, टॅबधारक इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढणार आहे. यात डेस्कस्टॉप पीसी कालबाह्य़ होणार नसले, तरी त्यांच्यावरील पूर्णावलंबित्व दूर होणार आहे. आज रेल्वे, बस आणि सार्वजनिक ठिकाणी टॅबलेट पीसीवर मल्टिटास्किंगचे सुख अनुभवताना दिसणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत या वर्षांत भरमसाट वाढ झालेली पाहायला मिळणार आहे. स्वस्त झालेली टॅब्ज कॅमेरापासून, संगणक, इंटरनेट, म्युझिक प्लेअर, सिने डिस्प्लेअर, मोबाइल फोन यांच्यासोबत सुविधांची खाण समोर करीत असल्यामुळे या टॅबवर्षांत टॅबलेट पीसीचे आज असणारे कुतूहल पुढच्या वर्ष अखेरीपर्यंत शून्यापर्यंत आलेले असेल. कारण तळागाळापर्यंत टॅबलेट पीसीचा प्रसार झालेला असेल. टॅबखेरीज उपयोजित टेक्नोलॉजीसाठी २०१३ वर्ष कसे असेल, त्याचा पुढावा पाहूयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लवचीक मोबाइल
मोबाइल फोनचा आय क्यू त्याच्या स्मार्टपणामुळे उत्तरोत्तर वाढत गेला असल्याने येत्या वर्षांत टॅबच्या स्पर्धेत मोबाइलमध्ये आणखी काय प्रगती होईल याबाबत कुतूहल असेल, तर कसेही वळवता येणारे ‘बेण्डी स्क्रीन स्मार्ट फोन’ सॅमसंग बाजारात आणणार आहे. वळवा, पिरगळा, भिंतीवर आपटा किंवा खेळण्यासारखे विविधाकार द्या, मोबाइल सुस्थितीमध्ये शाबूत राहिलेले असतील. अर्थात सॅमसंगने हा फोन यशस्वी केल्यास टॅबलेट पीसीही अशाच प्रकारे बनतील, यात शंका नाही.

गॉगल-ए-गुगल
प्रत्येकाला जेम्स बॉण्डइतकी तंत्रशक्ती पुरविणारा गॉगल-ए-गुगल हे बहुप्रतीक्षित आकर्षण या वर्षांत दाखल होणार आहे. कॅमेरा, अॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टममुळे मोबाइल, संगणक, एमपी थ्री प्लेअर, डाटा सेव्हर आणी इतर स्मार्ट गॅझेट्सच्या कार्याची वर्णी असलेला हा गॉगल सूर्यप्रकाशापासून डोळ्यांचे रक्षण करण्याचे मूलभूत कामही उत्तमरीत्या पार पाडणार आहे.

लाइफबुक
डिजिटल कॅमेरा, मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट आदी सर्व गोष्टींना एकाच गॅझेटमध्ये आणणारे लाइफबुक फुजित्सु ही जपानी कंपनी या वर्षांत बाजारात दाखल करीत आहे. इतक्या साऱ्या स्मार्ट गॅझेट्सची शक्ती असल्याने त्याची किंमतही स्मार्ट असेल, हे सांगायला नको. तरीही हे गॅझेट यशस्वी झाल्यास, अनेक गॅझेट्सवर गदा येऊ शकेल.

आयफोन ५ एस
अॅपलच्या आताच्या अतिस्मार्ट फोनहून अधिक क्षमतेचा आयफोन फाय एस हा जुलै २०१३मध्ये दाखल होणार आहे. याच दरम्यान आयपॅडची पुढील आवृत्तीही दाखल होण्याचा अंदाज आहे. अॅपल आयफोन फाय एसद्वारे सुविधांची आणखी किती बरसात करतो याकडे टेक्नोजगताचे लक्ष लागले आहे. त्याच वेळी अॅपलचा स्पर्धक सॅमसंगही गॅलेक्सी फोर एस आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

जून ते ऑगस्ट या  कालावधीत आयफोन फाय एस आणि आयपॅडची नवी आवृत्ती दाखल झाली असेल. याच दरम्यान सॅमसंग आणि अॅपलचे  नवे युद्ध दिसणार आहे.