मुंबई : ताडदेव येथील बेलासिस पुलालगतच्या मासळी बाजारातील मासे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी उभारण्यात आलेले शौचालय महानगरपालिका प्रशासनाने मागील आठवड्यात जमीनदोस्त केले होते. यामुळे कोळी महिलांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यांनतर महापालिकेने शुक्रवारी या महिलांसाठी तात्पुरत्या स्वरुपात शौचालयाची सुविधा उपलब्ध केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेलासिस पुलाच्या बांधकामात मासळीबाजार अडथळा ठरला आहे. त्यामुळे पालिकेने ही जागा मोकळी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हे शौचालय गेल्या आठवड्यात जमीनदोस्त करण्यात आले. तसेच, मंगळवारी बाजारातील वीज जोडणीही कापली. महिलांनी विनवण्या केल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी पुन्हा वीज जोडणी पूर्ववत केली. मात्र, या कामाकरीता पालिकेने महिलांकडून ४ हजार रुपये आकारले. बाजारात शौचालयाची अन्य सुविधा नसल्याने महिलांची प्रचंड कुचंबणा होत असल्याची खंत मासळी विक्रेत्या महिलांकडून व्यक्त केली जात होती. तसेच त्यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. अखेर महापालिकेने पत्र्याचे शेड उभारून महिलांना तात्पुरत्या स्वरुपात शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिली.

हेही वाचा – मुंबई : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ‘एफडीए’ सतर्क; हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबमध्ये विशेष तपासणी मोहीम सुरू

हेही वाचा – मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक

पुनर्वसनाबाबत कोळी बांधवांनी १० डिसेंबर रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेने सर्व महिलांना अनुज्ञापत्रे व आधारकार्ड घेऊन ९ डिसेंबर रोजी सुनावणीसाठी संबंधित पालिका कार्यालयात बोलावले आहे. सुनावणीदरम्यान महापालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास कोळी बांधव पालिका कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taddev fish market toilet problem mumbai municipal corporation mumbai print news ssb