मुंबई : केंद्र सरकारने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा म्हणजेच हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा. तसेच पणन मंडळाने अशा प्रकरणांत आजवर काय कारवाई केली, त्याचा अहवाल सादर करा, असे थेट आदेश प्रभारी कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांनी दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – मुंबईच्या किमान तापमानात घट

हेही वाचा – प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत ३५ लाख लाभार्थी!

आयुक्त भागडे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत कृषी विभागातील संचालक, पणन संचालनालय, वखार महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी भागडे म्हणाले, केंद्र सरकारने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी होणार नाही, याची खबरदारी कृषी पणन संचलनालयाने घेतली पाहिजे. व्यापारी शेतीमाल कमी दर्जाचा असल्याचे दाखवून जाणीवपूर्वक हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमालाची खरेदी करतात. अशा प्रकारे कमी दराने शेतीमालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर पणन मंडळाने आजवर काय कारवाई केली, याचा सविस्तर तपशील सादर करावा. शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे. हमीभाव आणि प्रत्यक्ष बाजारभाव यांचे संनियंत्रण करण्यासाठीची यंत्रणा जिल्हा व तालुका पातळीवर सक्रिय असली पाहिजे. शेतीमाल खरेदी विक्रीसाठी ई-नाम प्रणालीचा प्रभावी वापर झाल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असेही भागडे म्हणाले.