उच्च न्यायालयाचे आदेश
महापालिकेच्या शीव रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वात ज्येष्ठ प्राध्यापक असलेल्या डॉ. सुलेमान र्मचट यांना नियुक्ती देण्याबाबतच्या प्रस्तावावर महिन्याभरात निर्णय घ्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिले. आपल्याला अधिष्ठातापद न देता डावलण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत असल्यामुळे डॉ. र्मचट यांनी थेट न्यायालयाचे दाद ठोठावले आहे. सेवाज्येष्ठतेनुसार आपली अधिष्ठातेपदी नियुक्ती करण्याच्या प्रस्तावावर निर्णय देण्याची विनंती डॉ. र्मचट यांनी केली आहे. न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती के. के. तातेड यांच्या खंडपीठासमोर डॉ. र्मचट यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळेस सेवाज्येष्ठतेनुसार अधिष्ठातेपद देण्याबाबत आपण पालिका प्रशासनाकडे प्रस्ताव दिल्याचे आणि तो विचाराधीन असल्याचे प्रशासनातर्फे आपल्याला सांगण्यात आल्याची माहिती डॉ. र्मचट यांच्यावतीने देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने प्रस्तावावर एका महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले.
डॉ. र्मचट यांच्या नियुक्तीबाबत महिनाभरात निर्णय घ्या
महापालिकेच्या शीव रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वात ज्येष्ठ प्राध्यापक असलेल्या डॉ. सुलेमान र्मचट यांना नियुक्ती देण्याबाबतच्या प्रस्तावावर महिन्याभरात निर्णय घ्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई महानगरपालिका
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-02-2013 at 04:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take decision on dr marchant appointment